mumbai news News: water at night in aarey colony tribal area – जग झोपले की आम्ही पाणी भरतो

Get real time updates directly on you device, subscribe now.

mumbai news News: water at night in aarey colony tribal area – जग झोपले की आम्ही पाणी भरतो

image
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
आरेमधील आदिवासी पाडे आणि वस्त्या यांच्या अस्तित्वाचा वाद दीर्घकाळ सुरू आहे. या वस्त्या आणि पाड्यांना नागरी सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे येथे पाण्यासाठी नागरिकांना झुंजावे लागते. आरेच्या पाडे आणि वस्त्यांमध्ये राहणारे नागरिक ‘जग झोपले की आमच्याकडे पाणी येते आणि जेव्हा पाणी येते तेव्हा ते भरावेच लागते,’ असे सांगत आपली व्यथा मांडतात.
आरेत अनेक घरांमध्ये नळ आहे. मात्र या नळाला पाणी केव्हा येईल, याची खात्री देता येत नाही. युनिट सहामधील रहिवासी महेश घाणेकर यांनी रात्री बारा-साडे बारानंतर केव्हाही पाणी येते आणि मग जग झोपते तेव्हा पाणी भरावे लागते, असे सांगितले. दिवसा नोकरी आणि रात्री पाणी अशी कसरत करत येथील अनेक नागरिक जगतात. पाण्याशिवाय घर चालणार कसे? त्यामुळे भांडी, ड्रम भरून ठेवावे लागतात. त्यातही एखादा दिवस पाणी अजिबातच येत नाही त्यामुळे त्याचीही तरतूद करून ठेवणे गरजेचे असते, असे त्यांनी सांगितले. काही वेळा पिण्याच्या पाण्याची सोय परिसरातील विहिरींमुळे होते. काही वेळा आरेतील गोठ्यांमधून पाणी आणावे लागते. मात्र आरेमध्ये पसरलेली अफाट वस्ती दर वेळी गोठ्यांवर अवलंबून राहू शकत नाही, याचीही जाणीव त्यांनी करून दिली.
महेश बोलाडे हे आरेतील रहिवासी. त्यांनीही दिवसभर पाणी नसल्याची माहिती दिली. रात्री एक दीड वाजता कधीतरी पाणी येते, तेव्हा पाणी भरायला लागते, असे ते म्हणाले. मंगळवार, शुक्रवारी त्यांच्याकडे पाणी येत नाही. त्यातही पाण्याचा दाब कमी असेल तेव्हा एखाद्या घरी पाणी येते, एखाद्या घरी पाणी येत नाही अशीही अवस्था होते. त्यामुळे ज्यांच्या घरी पाणी असेल त्यांच्या घरी जाऊन पाणी भरण्यासाठी रांग लावायची असे वास्तवही त्यांनी सांगितले. या वस्तीतील अनेक महिला नोकरी करतात. त्यांच्यासाठी रात्री पाणी भरायचे आणि दिवसा नोकरीवर जायचे हे काम बिकट होते.
आरेतील आदिवासी पाड्यांवरची स्थितीही काहीशी अशीच आहे. केल्टी पाडा आणि नवशाचा पाडा येथे अद्यापही पाणी नाही. बाकी पाड्यांवर दिवसातून दोन वेळा पाणी येते. मात्र यातही काही ठिकाणी रात्रीचे पाणी येते. घरात नळ नसल्याने टेकडी उतरून पाणी भरायला जावे लागते. यामध्ये अर्थातच धोका असल्याची माहिती आरेतील स्थानिक प्रकाश भोईर यांनी दिली. नवशाच्या पाड्याजवळ टाकी बांधण्यात आली आहे. या टाकीवर नवशाच्या पाड्यासाठी पाणी असेही लिहिले आहे. मात्र हे पाणी या पाड्यातील लोकांना मिळत नाही. मग ते पाणी जाते कुठे, असा प्रश्न तेथील स्थानिक आदिवासी उपस्थित करतात.
आरे परिसराजवळ असलेल्या रॉयल पाम या उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांचीही पाण्यामुळे अवस्था बिकट आहे. दिवसाचे २४ तास पाणी मिळणे येथील नागरिकांसाठी दुरापास्त असल्याचे काही स्थानिकांनी सांगितले. या इमारतींमध्ये दिवसातून एखाद-दुसऱ्या वेळा टँकर येतो. टँकरशिवाय येथे तरणोपाय नाही, असे सांगण्यात येते.

2018-12-26 23:28:24

Images are for reference only.Images gathered automatic from google.All rights on the images are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More