mumbai news News: no shouting – जल्लोष नाही

Get real time updates directly on you device, subscribe now.

mumbai news News: no shouting – जल्लोष नाही

mumbai news News: no shouting – जल्लोष नाही
2018-12-05 12:47:26

image
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाज बांधवांनी आत्महत्या करून स्वतःच्या जिवाचे बलिदान दिले, त्या बांधवांच्या प्रती आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. या विजयाचा कोणताही उत्सव साजरा होणार नाही अशी भूमिका सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केली.
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात जीव गमावणाऱ्या बांधवांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आझाद मैदान येथेही मराठा क्रांती मोर्चाने २६ तारखेपासून आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेले उपोषण त्या समाजबांधवांना श्रद्धांजली अर्पण करून मागे घेतले.
सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय़ जाहीर केल्यानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, भाई जगताप, एकनाथ शिंदे अशा विविध नेत्यांनी मराठा क्रांती मोर्चाची भेट घेतली. सरकारच्या या निर्णयामुळे मराठा समाजामध्ये समाधानाची भावना असून त्यांनी सरकार व विरोधी पक्ष या दोघांचेही या निर्णयासाठी अभिनंदन केले आहे. या आऱक्षणाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठीही सरकारने आग्रही प्रयत्न करण्याची अपेक्षा मराठा क्रांती मोर्चाकडून व्यक्त करण्यात आली. १६ ते २६ नोव्हेंबर या कालावधीमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात संवाद यात्रा काढण्यात आली होती. समाजातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याची व आत्मक्लेशाची भावना वाढीस लागली होती. त्यांच्याशी संवाद साधण्याच्या निमित्ताने तसेच त्यांनी आत्महत्येसारखा कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये यासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा उद्देशही सफल झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गयकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफीसह राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही मराठा समाजाने केली होती. शेतमालाला उत्पादन खर्च अधिक दीडपट हमीभाव व डॉ. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, या इतर मागण्याही आरक्षणाच्या मागण्यांसह सरकारपुढे मांडण्यात आल्या. विरोधक आणि सत्ताधारी पक्षाने या मुद्द्यांमध्ये राजकारण न पाहता त्यात समाजाचे हित पाहावे असेही आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते.mumbai news News: no shouting – जल्लोष नाही
2018-12-05 12:47:26

Images are for reference only.Images gathered automatic from google.All rights on the images are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More