Migration Of Laborers For Work | परभणी : कामासाठी मजुरांचे स्थलांतर

Get real time updates directly on you device, subscribe now.

Migration Of Laborers For Work | परभणी : कामासाठी मजुरांचे स्थलांतर

image
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम ( परभणी ) : तालुक्यात दुष्काळी तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे; परंतु, शासकीय स्तरावर अजूनही दुष्काळ निवारण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे कामे ठप्प पडली आहेत. हाताला काम नसल्याने मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर सुरू झाले आहे.
पालम तालुक्यात ६६ ग्रामपंचायतींतर्गत ८१ गावांचा समावेश आहे. गोदावरी नदीच्या काठावरील १५ गावे वगळता इतर क्षेत्र कोरडवाहू आहे. दुष्काळ पडल्याने शेतातील कामे बंद झाली आहेत. तसेच गावात व शिवारात मजुरांच्या हाताला कामच शिल्लक राहिलेले नाही.
पंचायत समितीने अजूनही रोजगार हमीच्या एकाही कामाला सुरुवात केलेली नाही. याचा फटका मजुरांना बसत आहे. दुष्काळाची दाहकता वाढत असतानाही प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.
गावात काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या विवंचनेत मजूरवर्ग सापडला आहे. बहुतांश कुटुंबियांनी ऊसतोडीच्या कामासाठी घर सोडले आहे. तर मजूर सध्या कामाच्या शोधात पुणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड या शहरांकडे धाव घेत आहेत.
Web Title: Parbhani: Migration of laborers for work

2018-12-18 15:24:06

Images are for reference only.Images gathered automatic from google.All rights on the images are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More