in

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): यूएसएआयडीच्या सहकार्यामुळे विविध प्रकल्पांना गती

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): यूएसएआयडीच्या सहकार्यामुळे विविध प्रकल्पांना गती

यूएसएआयडीच्या शिष्टमंडळाने घेतली
मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, दि. १६ : व्यापार, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात यूएसएआयडीच्या (युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर
इंटरनॅशनल डेव्हलपमेंट)सहकार्यामुळे विविध प्रकल्पांना गती मिळेल
, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
व्यक्त केला.

यूएसएआयडीच्या शिष्टमंडळाने आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.  शिष्टमंडळात यूएसएआयडीचे प्रशासकीय प्रमुख
ग्रेगरी ह्युगर
, यूएस कौन्सुल जनरल एडगार्ड कागन, प्रकल्प संचालक कॅथरीन स्टिव्हन्स यांचा समावेश होता.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मुंबई-अफगाणिस्तान (काबुल)
विमानसेवा सुरू असल्याने रूग्ण सेवेत वाढ झाली आहे. महाराष्ट्रातर्फे
अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या एक हजार मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाला सहकार्य
करण्याबाबतही त्यांनी सांगितले.

सप्टेंबर-२०१८ मध्ये मुंबईत होणाऱ्या भारत-अफगाणिस्तान व्यापार व विकास
कार्यक्रमात सहभाग घेऊन सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

श्री. ह्युगर म्हणाले, शैक्षणिक, व्यापार या संबंधाबरोबर भारताशी आणि महाराष्ट्राशी अधिक संबंध दृढ करायचे आहेत.
मुंबई हे व्यापाराचे मध्यवर्ती केंद्र आहे
, इथे आम्ही १०० मिलिअन डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

यावेळी राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजगोपाल देवरा उपस्थित होते.

Source
Opens in another tab

<----------End-Of-This-News-Article---------->



Nasiknews.in is not in control of the media owned by the authors or creators of this post.This is an aggregated news post.This is not a financial or commercial suggestion to the readers.If you think this content is infringing any copyright or trademark or if you have reasons to request its take down, then please contact us with the title of this article Please read our website terms and other policies at the bottom of this site.

What do you think?

18 points
Upvote Downvote

Total votes: 0

Upvotes: 0

Upvotes percentage: 0.000000%

Downvotes: 0

Downvotes percentage: 0.000000%

Written by माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे. शासन आणि जनता यांना जोडणारा तो एक महत्वाचा दुवा असून शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत आणि त्याबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालयास पार पाडावी लागते.

Comments

Leave a Reply

Loading…

Comments

comments

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र बनण्याची महाराष्ट्राची क्षमता

मंत्रिमंडळ निर्णय दि. १६ मे २०१८

मंत्रिमंडळ निर्णय दि. १६ मे २०१८