in

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र बनण्याची महाराष्ट्राची क्षमता

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र बनण्याची महाराष्ट्राची क्षमता – डॉ. प्रदीप कुमार व्यास

Pages

जागतिक दर्जाचे आरोग्य केंद्र बनण्याची महाराष्ट्राची क्षमता – डॉ. प्रदीप कुमार व्यास

मॉर्डन हेल्थकेअर : मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल चर्चासत्र
मुंबई, दि. १६ : 
पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांची उत्तम दर्जाची
कार्यक्षमता
, भांडवल, कार्यशक्ती
असल्याने भारत जागतिक दर्जाचे रोगाचे निदान करणारा देश ठरत आहे.  शहर ते ग्रामीण भागातील आरोग्य सेवा
जोडण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहोत. सर्व 
रूग्णालयाची माहिती एकाच व्यासपीठावर देश तसेच विदेशातील नागरिकांना मिळावी
यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप
कुमार व्यास यांनी सांगितले.
सेवा क्षेत्राविषयक जागतिक प्रदर्शनात आधुनिक आरोग्य निगा-
मेडिकल व्हॅल्यू ट्रॅव्हल या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
डॉ व्यास बोलत होते.
डॉ. व्यास म्हणाले, विदेशातून
येणाऱ्या रूग्णांना रोगाचे निदान कोणत्या रूग्णालयात होते. त्यासाठीचे वैद्यकीय
शुल्क किती या सर्वाची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा
वापर करण्यात येणार आहे. राज्यातील रूग्णालय अधिक कार्यक्षम असणे यासाठी त्यांवर
नियमात्मक बंधणे असणार आहेत.
विविध देशातून लोक भारतात रोगाचे निदान करण्यासाठी येतात.
अॅलोपॅथी
, होमिओपॅथी , युनानीची
केंद्रे आहेत. महाराष्ट्रात 22 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. 25 खासगी
महाविद्यालये आहेत. शहर ते ग्रामीण भागात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ते प्राथमिक
आरोग्य केंद्रे आहेत. शासनातर्फे विविध विमा योजना आणि आरोग्यदायी योजना राबविल्या
जात आहेत. विमा योजनेअंतर्गत दीड कोटीपेक्षा जास्त लाभार्थी आहेत. बालकांच्या
मृत्यूचे प्रमाण घटत असून
, आदिवासी आणि अल्पसंख्याकांसाठीही
शासन योजना राबवित आहे. असे सांगत डॉ. व्यास म्हणाले
, काही
वर्षापूर्वी मोठ्या रोगाचे निदान फक्त विदेशात व्हायचे
, पण
ही परिस्थ‍िती बदलली असून महाराष्ट्राकडेही आरोग्याच्या निदान करणाऱ्या सुविधा
असून कार्यक्षम वैद्यकीय अधिकारी आहेत. यामुळे महाराष्ट्र लवकरच जागतिक दर्जाचे
आरोग्य केंद्र बनणार आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे
म्हणाले
, वर्षाला 60 हजार डॉक्टर्स तयार होत आहेत.
प्रत्येक डॉक्टर
, नर्स, लॅब टेक्निशियन्स
यांचे पॅरामेडिकल कौन्सिल ऑफ स्टेटसोबत नोंदणी बंधनकारक आहे. विदेशातील
रूग्णांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी अनेक नियम बंधनकारक आहेत.
पद्मश्री रमाकांत देशपांडे म्हणाले, भारतात उत्तम वैद्यकीय सुविधांबरोबरच तज्ज्ञ सर्जन आहेत. इतर
देशापेक्षा भारतात कमी दरात रोगाचे निदान केले जाते. त्याचबरोबर कमी वेळात उपचार
केले जातात. जवळपास ४० लाख रूग्ण आरोग्याचे निदान करण्यासाठी भारताची निवड करतात.
कार्यक्रमास आयुर्वेद हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य
कार्यकारी अधिकारी राजीव वासुदेवन
, कौशल्य
विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रविंद्रन
, वाणिज्य
आणि उद्योग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ. अनुप वाधवान यांच्यासह विविध देशाचे
प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Source
Opens in another tab

<----------End-Of-This-News-Article---------->Nasiknews.in is not in control of the media owned by the authors or creators of this post.This is an aggregated news post.This is not a financial or commercial suggestion to the readers.If you think this content is infringing any copyright or trademark or if you have reasons to request its take down, then please contact us with the title of this article Please read our website terms and other policies at the bottom of this site.

What do you think?

18 points
Upvote Downvote

Total votes: 0

Upvotes: 0

Upvotes percentage: 0.000000%

Downvotes: 0

Downvotes percentage: 0.000000%

Written by माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे. शासन आणि जनता यांना जोडणारा तो एक महत्वाचा दुवा असून शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत आणि त्याबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालयास पार पाडावी लागते.

Comments

Leave a Reply

Loading…

Comments

comments

'मिशन शौर्य'मधील आदिवासी विद्यार्थ्यांकडून एव्हरेस्ट शिखर सर

‘मिशन शौर्य’मधील आदिवासी विद्यार्थ्यांकडून एव्हरेस्ट शिखर सर

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): यूएसएआयडीच्या सहकार्यामुळे विविध प्रकल्पांना गती

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): यूएसएआयडीच्या सहकार्यामुळे विविध प्रकल्पांना गती