Complete These Five Financial Tasks Before December End | डिसेंबर महिना संपण्यापूर्वीच ही पाच आर्थिक कामं उरकून घ्या

Get real time updates directly on you device, subscribe now.

Complete These Five Financial Tasks Before December End | डिसेंबर महिना संपण्यापूर्वीच ही पाच आर्थिक कामं उरकून घ्या

image
नवी दिल्ली – काही दिवसांतच आपण वर्ष 2018 ला बाय-बाय करुन वर्ष 2019चं जल्लोषात स्वागत करणार आहोत. नवीन वर्षांत कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नये यासाठी डिसेंबर महिना संपण्यापूर्वीच आर्थिक बाबींशी संबंधित कामं लवकरात लवकर उरकून घ्या. खाली नमुद करण्यात आलेली पाच आर्थिक कामं डिसेंबर महिना संपण्यापूर्वीच उकरणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
1.31 डिसेंबरपूर्वी भरा इनकम टॅक्स रिटर्न्स
जर अद्यापपर्यंत तुम्ही इनकम टॅक्स रिटर्न्स फाईल केलेली नसेल तर न विसरता हे काम 31 डिसेंबरपूर्वी नक्की करा. कारण नवीन इनकम टॅक्स लॉ (कलम 234 एफ)नुसार जी लोक अंतिम मुदतीनंतर इनकम टॅक्स रिटर्न्स फाईल करतील त्यांना दंड भरावा लागेल. अंतिम मुदतीनंतर इनकम टॅक्स रिटर्न्स फाईल करणाऱ्यांना 5 हजार रुपये दंड म्हणून भरावा लागेल. दरम्यान, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांहून कमी आहे, त्यांना एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल.
2. EMV चिप बेस्ड कार्ड
27 ऑगस्ट 2015 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांचे मॅग्नेटिक स्टाइप डेबिट आणि क्रेडिट कार्ड बदलून EVM (युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा) चिप बेस्ड कार्ड द्यावं. पण 31 डिसेंबरपूर्वीच EVM बेस्ड चिप कार्ड घ्यावे. कारण,यानंतर मॅग्नेटिक स्ट्राइप असणारी सर्व कार्ड्स ब्लॉक करण्यात येणार आहेत. अद्यापपर्यंत जर तुम्ही ईएमव्ही चिप बेस्ड कार्डसाठी अर्ज केलेला नसेल तर 31 डिसेंबरपूर्वी जरुर अर्ज करा. महत्त्वाचे म्हणजे ईएमव्ही बेस्ड कार्डसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकार शुल्क भरावे लागणार नाही.
(…अन्यथा 31 डिसेंबरपर्यंत ब्लॉक होईल डेबिट अन् क्रेडिट कार्ड)
2. EMV चिप बेस्ड कार्ड
27 ऑगस्ट 2015 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, सर्व बँकांनी आपल्या ग्राहकांचे मॅग्नेटिक स्टाइप डेबिट आणि क्रेडिट कार्ड बदलून EVM (युरोपे, मास्टरकार्ड आणि व्हिसा) चिप बेस्ड कार्ड द्यावं. पण 31 डिसेंबरपूर्वीच EVM बेस्ड चिप कार्ड घ्यावे. यानंतर मॅग्नेटिक स्ट्राइप असणारी सर्व कार्ड्स ब्लॉक करण्यात येणार आहेत. अद्यापपर्यंत जर तुम्ही ईएमव्ही चिप बेस्ड कार्डसाठी अप्लाय केलेले नाही तर 31 डिसेंबरपूर्वी अर्ज करा. महत्त्वाचे म्हणजे ईएमव्ही बेस्ड कार्डसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकार शुल्क भरावे लागणार नाही.
3. नॉन-CTS चेक ठरणार कालबाह्य
आरबीआयच्या नियमानुसार, नॉन सीटीएस चेकबुकचा वापर पूर्णतः बंद करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर बँकांना आपल्या ग्राहकांसाठी सीटीएस 2010 चे चेकबुक जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2019मध्ये जर ग्राहक बँकेकडे निधी हस्तांतरणासारख्या कामांसाठी नॉन-सीटीएस चेक जमा करत असतील तर संबंधित चेक क्लिअर होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.
आरबीआयच्या निर्देशानुसार 1 सप्टेंबर 2018 पासून, नॉन-सीटीएस चेकच्या क्लिअरन्सचा अवधी एका महिन्यात केवळ एकदा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी करण्यात आला आहे. दरम्यान, 31 डिसेंबर 2018 नंतर नॉन सीटीएस चेक क्लिअरन्ससाठी स्वीकारला जाणार नाही.
(SBIनं बंद केली ही सुविधा, आता पैसे काढण्यास येणार अडचणी)
CTS चेकमध्ये मिळणार चांगल्या सुविधा
सीटीएस चेक वटण्यास जास्त वेळ लागत नाही. या यंत्रणेत चेक एका बँकेतून दुसऱ्या बँकेत घेऊन जावे लागत नाही. चेक वटवण्यासाठी तुम्हाला फक्त इलेक्ट्रॉनिक कॉपी दाखवावी लागते. या यंत्रणेत ग्राहकांना चांगल्या सुविधा पुरविल्या जातात.
4. SBIचं नेट बँकिंग तपासा
ज्या ग्राहकांच्या मोबाइल क्रमांकांची नोंदणी झालेली नाही, त्या ग्राहकांची इंटरनेट बँकिंग सेवा एसबीआयनं 1 डिसेंबर 2018 पासून बंद केली आहे. एसबीआयनं आपल्या ग्राहकांसाठी ‘Online SBI’ वेबसाइटच्या माध्यमातून मोबाइल क्रमांकाची नोंदणी करण्यास सांगितले होते. जर तुम्हाला नेट बँकिंग सर्व्हिसचा वापर करताना अडथळे येत असतील तर ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या शाखेत किंवा एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन आपला मोबाइल क्रमांकाची बँक खात्यासहीत नोंदणी करुन घ्या.
5. SBI Buddy अॅपद्वारे Reimbursement क्लेम करा
एसबीआयनं आपला मोबाइल वॉलेट अॅप SBI Buddy 30 नोव्हेंबर 2018 पासून बंद केला आहे. या अॅपमध्ये बिल पेमेंट, रीचार्ज आणि मनी ट्रान्सफरसारख्या सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. तुम्ही या अॅपचा वापर करत होतात किंवा आजही अॅप वॉलेटमध्ये तुमची रक्कम शिल्लक असल्यास आपल्या जवळील एसबीआय शाखेत जाऊन Reimbursement क्लेम करावा
Web Title: complete these five financial tasks before December end

2018-12-26 16:29:24

Images are for reference only.Images gathered automatic from google.All rights on the images are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Do NOT follow this link or you will be banned from the site!