Citizens Oppose Transfer Of Land For National Highway At Thapati | थापटी येथे राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन हस्तांतरास नागरिकांचा विरोध
Citizens Oppose Transfer Of Land For National Highway At Thapati | थापटी येथे राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन हस्तांतरास नागरिकांचा विरोध
पाचोड ( औरंगाबाद ) : औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या थापटी येथे आज सकाळी संपादित केलेली जमीन महसूल विभाग ताब्यात घेत असताना काही नागरिकांनी याला विरोध दर्शवला. यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते.
औरंगाबाद ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे चार पदरी रोडचे काम सुरू आहे या रोडच्या कामासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी गावागावातील जमिनी संपादित केल्या आहेत. या संपादित जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना दिला आहे. या महामार्गाचे काम सुरू झाले आहे मात्र काही ठिकाणी किरकोळ वाद सुरू आहेत.
थापटी येथील संपादित केलेली जमीन हस्तांतरित करण्यासाठी मंगळवारी महसूल विभागाचे पैठण तहसीलदार विभागाचे नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी , यांनी पाचोड पोलिस स्टेशन चे स पो नि अभिजित मोरे यांनी पाचोड पोलिसांचा फौजफाटा सोबत घेऊन थापटी येथे आले असता यावेळी गावातील काही नागरिकांनी यास विरोध केला. जोपर्यंत आमच्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जमिनी ताब्यात देणार नसल्याचा पवित्रा काही गावकऱ्यांनी घेतला. यावेळी नायब तहसीलदार व स पो नि अभिजित मोरे यांनी त्या गावकऱ्यास समजावून सांगितले व प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती केली. यानंतर नागरिकांचा विरोध मावळला व त्यांनीमहसूल विभागाच्या ताब्यात जमीन दिली. त्यांनी जमिनीचे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या हस्तांतर केले.
Web Title: Citizens oppose transfer of land for National Highway at Thapati
2019-02-03 00:51:26
Images are for reference only.Images gathered automatic from google.All rights on the images are with their original owners.