Bigg Boss 12 : Jasleen Matharu Want To Apologise Anup Jalota | Bigg Boss 12 : गंमत पडली भारी! आता जसलीनला मागायचीय अनुप जलोटांची माफी!

Get real time updates directly on you device, subscribe now.

Bigg Boss 12 : Jasleen Matharu Want To Apologise Anup Jalota | Bigg Boss 12 : गंमत पडली भारी! आता जसलीनला मागायचीय अनुप जलोटांची माफी!

image
ठळक मुद्दे अनुप जलोटांनी त्यांची शिष्या जसलीन मथारूसोबत ‘बिग बॉस 12’च्या घरात प्रवेश घेतला होता. हा प्रवेश घेताना आम्ही दोघेही तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत, हे नॅशनल टीव्हीवर सांगून अनुप व जसलीन यांनी खळबळ उडवून दिली होती.
‘ बिग बॉस 12’च्या सीझनमधील सगळ्यांत वादग्रस्त ठरलेली जोडी म्हणजे, भजनसम्राट अनुप जलोटा आणि जसलीन मथारू. आता ही जोडी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलीय. आधी अनुप जलोटा बिग बॉसच्या घरातून आऊट झालेत. यानंतर जसलीनही आऊट झाली आणि हे दोघेही बाहरे येताच त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा पुन्हा सुरू झाली.
अनुप जलोटा बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर त्यांनी जसलीनसोबतच्या रिलेशनशिपचा इन्कार केला होता. ते केवळ एक नाटक होते. बिग बॉससाठी रचलेले नाटक होते, असे त्यांनी सांगितले होते. आता जसलीननेही नेमका हाच सूर आळवला आहे. होय, अनुप जलोटांसोबतचे रिलेशनशिप केवळ एक प्रैंक होते, असे तिने सांगितले. केवळ इतकेच नाही तर यासाठी अनुप जलोटा यांची माफी मागणार असल्याचेही सांगितले.
मी व अनुप जलोटा गुरु आणि शिष्या म्हणूनच बिग बॉसच्या घरात जाणार होतो. पण बॅकस्टेजवर अचानक मला गंमत सुचली आणि आपण गुरु-शिष्या म्हणून नाही तर गर्लफ्रेन्ड- बॉयफ्रेन्ड म्हणून घरात प्रवेश करू, असे मी अनुपजींना म्हणाले. मी त्यासाठी त्यांना तयार केले. त्यावेळी ही गंमत इतकी अंगलट येईल, असे मला वाटले नव्हते. आता मी घराबाहेर पडले आहे. आता मी अनुप जलोटांची माफी मागू इच्छिते. ते माझे गुरु आहेत आणि मी त्यांची शिष्या. हेच खरे आहे, असे ती म्हणाली.
अनुप जलोटांनी त्यांची शिष्या जसलीन मथारूसोबत ‘ बिग बॉस 12 ’च्या घरात प्रवेश घेतला होता. हा प्रवेश घेताना आम्ही दोघेही तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत, हे नॅशनल टीव्हीवर सांगून अनुप व जसलीन यांनी खळबळ उडवून दिली होती.
English summary :
Bigg Boss 12 Controversy: The most controversial part of ‘Bigg Boss 12’ season is that of Bhajan Samrat Anh Jalota and Jasleen Matharoo relationship. Now the pair is out of the Bigg Boss house. Earlier, Anup Jalota got out of the house of Bigg Boss.
Web Title: Bigg Boss 12 : jasleen matharu want to apologise anup jalota

2018-12-14 10:43:02

Images are for reference only.Images gathered automatic from google.All rights on the images are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Do NOT follow this link or you will be banned from the site!