Babasaheb Purandare: what work babasaheb purandare did to receive padmavibhushan award asked dr. shripal sabnis – पद्मविभूषणसाठी पुरंदरेंनी कोणता पराक्रम केला?: डॉ. श्रीपाल सबनीस

Get real time updates directly on you device, subscribe now.

Babasaheb Purandare: what work babasaheb purandare did to receive padmavibhushan award asked dr. shripal sabnis – पद्मविभूषणसाठी पुरंदरेंनी कोणता पराक्रम केला?: डॉ. श्रीपाल सबनीस

image
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी कोणता पराक्रम केला की, त्यांना सरकारने पद्मविभूषण दिला असा प्रश्न अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी उपस्थित केला. औरंगाबादमध्ये आयोजित ‘फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेत ते बोलत होते.
देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात आयोजित या व्याख्यानात बोलताना डॉ. सबनीस म्हणाले, ‘महात्मा फुले यांना हे सरकार भारतरत्न देणार होते असे आम्ही ऐकले होते. मात्र, कुणीकडे कसं फिरलं गेले माहिती नाही. अनेक जणांना पद्मविभूषण दिले गेले त्यांनी काय पराक्रम केले माहिती नाही.’
बाबासाहेब पुरंदरेंना मिळालेल्या पद्मविभूषण सन्मानाबाबतही सबनीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘बाबासाहेब पुरंदरेनी कोणते पराक्रम केले की, त्यांना हा पुरस्कार दिला गेला? सरकारला ते स्वातंत्र्य आहे. तुम्हीच निवडून दिलेले सरकार आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला आपल्याला आडवं जाता येणार नाही. बाबासाहेब हे इतिहासकार नाहीत मात्र, ते चांगले शाहीर आहेत त्यामुळे आपण ते विवेकाने घेऊ.’

2019-02-03 05:34:41

Images are for reference only.Images gathered automatic from google.All rights on the images are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Do NOT follow this link or you will be banned from the site!