सारा अली खानSara Ali Khan: simmba actress sara ali khans choice of nawab a man with moustaches for now – ‘डेटसाठी मुच्छड आवडेल’: सारा अली खान

Get real time updates directly on you device, subscribe now.

सारा अली खानSara Ali Khan: simmba actress sara ali khans choice of nawab a man with moustaches for now – ‘डेटसाठी मुच्छड आवडेल’: सारा अली खान

image
मुंबई:
अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खान ‘ सिंबा ‘ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान साराला डेटिंग बद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. डेटसाठी साराने खास अशी यादी बनवलेली नाही. परंतु डेटिंगसाठी मुच्छड तरुण आवडेल, असं बिनधास्त वक्तव्य तिनं केलं आहे.
यावेळी तिने बऱ्याच गोष्टी बिनधास्त शेअर केल्या. ‘सोशल मीडियावर माझं एक सिक्रेट अकाऊंट आहे. त्यात मी हॉट तरुणांवर लक्ष ठेवून असते. काही तरुणांच्या फोटोंना त्या सिक्रेट अकाऊंटवरूनच लाइकही करते. मी आतापर्यंत कोणत्याही मित्राबरोबरच्या लिंकअपच्या चर्चेत आलेले नाही. त्यामुळेच कदाचित मी थोडी वेगळी असावी,’ असं ती म्हणाली.
‘डेट करण्यापूर्वीची यादी मी तयार करत बसत नाही. तो मुलगा कसा असावा. त्याच्यात कोणते गुण असावेत, असं काही मी पाहत बसत नाहीत. हो, मात्र तो थोडा विनोदी स्वभावाचा असावा. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला असावा. मला वाटतं ह्युमर हाच माणसामधला सर्वश्रेष्ठ गुण आहे. पण ह्युमरबरोबर परिपक्वताही हवीच. आणि हो, आजकाल मला मुच्छड तरुणही आवडू लागले आहेत. त्यामुळेच ज्याच्यासोबत डेटिंगला जायचं त्याला मिशी असावी, असं मला वाटतं,’ असं तिनं सांगितलं.
सारा आणि रणवीर सिंहचा ‘सिंबा’ चित्रपट २८ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. या चित्रपटात सोनू सुद, वृजेश हिरजे, प्रकाश राज आणि आशुतोष राणा देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

2018-12-26 12:03:21

Images are for reference only.Images gathered automatic from google.All rights on the images are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More