in

सांगलीच्या उर्वी पाटीलने केला ट्रेकिंगचा विक्रम; वयाच्या दहाव्या वर्षी हिमालयातील सरपास शिखर सर

सांगलीच्या उर्वी पाटीलने केला ट्रेकिंगचा विक्रम; वयाच्या दहाव्या वर्षी हिमालयातील सरपास शिखर सर

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): सांगलीच्या उर्वी पाटीलने केला ट्रेकिंगचा विक्रम; वयाच्या दहाव्या वर्षी हिमालयातील सरपास शिखर सर

Pages

सांगलीच्या उर्वी पाटीलने केला ट्रेकिंगचा विक्रम; वयाच्या दहाव्या वर्षी हिमालयातील सरपास शिखर सर

नवी दिल्ली, दि. १६ : 
हिमालयातील शिवा‍लिक रेंज मधील १३ हजार ८०० फुटावरील काळाकुट्ट भोवताल उने
८ अंश सेल्सिअस तापमान आणि ताशी ३० ते ४० कि.मी. वेगाने वाहणारे वारे
, तितक्याच वेगाने होणारी बर्फवृष्टी, कडाडणाऱ्या वीजा अशा पार्श्वभूमीवर मूळच्या सांगलीच्या
व सध्या गोव्यात वास्तव्य करणाऱ्या उर्वी अनिल पाटील या १० वर्षाच्या मुलीने सरपास
हे शिखर सर केले आहे. एवढ्या लहान वयात सरपास सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय
मुलगी ठरली आहे.
उर्वीने आज महाराष्ट्र परिचय
केंद्रास भेट दिली व आपल्या विक्रमाविषयी माहिती दिली. ती म्हणाली
, आमच्या सरपास ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील कसोल
बेस कँपवरून ४ मे २०१८ पासून झाली. पहिले तीन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी
छोटे- छोटे ट्रेक केले. पुढे ७ मे पासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली. कसोल हे
६ हजार ५०० फुटावरचा बेस कँप असून पुढे ग्राहण (७६०० फुट) पद्री (९३०० फुट)
मिन्थाज (११२००फुट) नगारू (१२५००फुट) बिस्करी (११०००फुट) आणि बंधकथाज (८०००फुट)
असे कँप होते.
…असे सर केले अवघड सरपास शिखर
माझ्या ट्रेकींगच्या या सर्व कँपमध्ये
नगारु ते बिस्करी या कँपदरम्यान सरपास हे १३ हजार ८०० फुटांवरील शिखर आहे. आणि हे
शिखर ट्रेकिंगसाठी अत्यंत अवघड मानले जाते. साधारणपणे १४ कि.मी. चा संपूर्ण प्रवास
बर्फातला असून अत्यंत धोकादायक आहे. मुख्य शिखर सर करण्याची सुरुवात पहाटे २ वाजता
होते. चहा आणि गरम पाण्याबरोबर गुळ व फुटाने हा अल्पोपहार करून मी ट्रेकिंगला
सुरुवात केली. मात्र
, याच वेळेस वातारण अचानक बिघडले आणि बर्फवृष्टीला
सुरुवात झाल्याचे उर्वीने सांगितले. अशाही परिस्थितीत ट्रेक करण्याची सूचना कँप लीडर
यांनी दिल्याने पुन्हा पहाटे ३.१५ वाजता ट्रेकिंगला सुरुवात झाली. २०० मीटरच्या
अत्यंत अवघड चढाईनंतर सरपासच्या पठाराला सुरुवात झाली. १४ मे २०१८ ला पठारावर पोहोचल्याने
सरपास सर केल्याचा आनंद मोठा होता. माझ्यासारख्या लहानग्या मुलीसाठी ही खूप मोठी
उपलब्धीही होती.
असाही धोका पत्करला होता…
मुळात सरपास या शिखराच्या ट्रेकिंगसाठी
युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया या आयोजक संस्थेने ट्रेकिंगची वयोमर्यादा १५ वर्ष
ठेवली आहे. यात मी जेमतेम १० वर्षाची असल्याने मला ही संधी मिळणार नव्हती पण
, मी मनाचा हिय्या केला आणि हा ट्रेक करण्याचे ठरवले.
माझ्या वडिलांनी या संस्थेला सहमतीपत्र लिहून दिले आणि मला सरपासकडे मोर्चा
वळविण्याची रितसर परवानगी मिळाली.
अशी केली तयारी
हिमालयातील सरपास हा अवघड ट्रेक
असल्याने मला मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार
,व्यायाम व योगा यावर लक्ष केंद्रित केले. सकाळी दीड
तास समुद्र किनारपट्टीवरील वाळूत चालायचे व अर्धातास योगा व  व्यायाम करायचे. आहारामध्ये प्रामुख्याने सीफूड
व सुका मेवा घेत असे. हा प्रवास अत्यंत कडाक्याच्या थंडीत असल्याने अनेक लेअरची
कपडे
, गॉगल, ट्रेकिंग बूट, स्टिकही खरेदी केली त्याचा मला या प्रवासात खूप फायदा
झाल्याचे उर्वीने आत्मविश्वासाने सांगितले.

एव्हरेस्ट बेस कँप करण्याचे ध्येय
सरपास हे अत्यंत अवघड शिखर सर केल्याने
माझ्यातील आत्मविश्वास दुणावला आहे आणि जगातील सर्वात अवघड एव्हरेस्ट शिखर सर
करण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणून एव्हरेस्ट बेस कँप करण्याचे माझे ध्येय
असल्याचे उर्वीने सांगितले.         

Source
Opens in another tab

<----------End-Of-This-News-Article---------->



Nasiknews.in is not in control of the media owned by the authors or creators of this post.This is an aggregated news post.This is not a financial or commercial suggestion to the readers.If you think this content is infringing any copyright or trademark or if you have reasons to request its take down, then please contact us with the title of this article Please read our website terms and other policies at the bottom of this site.

What do you think?

18 points
Upvote Downvote

Total votes: 0

Upvotes: 0

Upvotes percentage: 0.000000%

Downvotes: 0

Downvotes percentage: 0.000000%

Written by माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे. शासन आणि जनता यांना जोडणारा तो एक महत्वाचा दुवा असून शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत आणि त्याबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालयास पार पाडावी लागते.

Comments

Leave a Reply

Loading…

Comments

comments

पाकिस्तान/बांग्लादेशातून भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान

पाकिस्तान/बांग्लादेशातून भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीच्या प्रयत्नातून विकासाचे पर्व

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): महाराष्ट्र-सिंगापूर संयुक्त समितीच्या प्रयत्नातून विकासाचे पर्व