Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

मा.श्री. दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्‍त नाशिक शहर यांच्या हरते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

राजे उमाजी नाईक जयंती कार्यकम

राजे उमाजी नाईक जयंती कार्यकम

मा.श्री. दीपक पाण्डेय, पोलीस आयुक्‍त नाशिक शहर यांच्या हरते राजे
उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्षमीबाई व दादांतह खोमणे यांच्या
पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्हयातील किल्ले पुरंदर येथे झाला. वडिल दादोजी खोमणे पुरंदर
किल्ल्याचे वतनदार होते. त्यामुळे उमाजीराजेंचे कुंटुंब पुरंदर व वज़गड किल्ल्याच्या संरक्षणाची
जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजीराजे
जन्मापासुनच हुशार चंचल शरीराने धडधाकट, उंचपुरे आणि करारी होते. त्यांनी पांरपारिक रामोशी
हेर कला लवकरच आत्मसात केली. भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी ब्रिटिशांविरूध्द लढणारे.

महाराष्ट्रातील प्रथम आदयकांतिकारक होते.

उमाजीराजेंनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरूध्द एक जाहिरनामा प्रसिध्द केला.
त्यात नमुद केले होते की, “लोकांनी इंगजी नोक-या सोडाव्यात सर्व राजे, रजवाडे,सरदार,
जमीनदार,वतनदार,देशवासीयांनी एकाच वेळी एमत्र येउन जागोजागी बंड पुकारावे आणि
इंग्रजांविरूध्द अराजकता माजवावी इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसार,पट्‌टी देउ नये.
असे करणा-यास नवीन सरकारमधुन जहागिरी इनामे वा रोख पैशांची बक्षीसे मिळतील. ज्यांची
वंशपरंपरागत वतने, तनखे, इ. इंग्रज सरकारमुळे गेले असतील ती सर्व त्यांना परत केली जातील
इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे व नवीन न्यायाधीष्ठीत राज्याची स्थापना
होईल. ” असे सांगुन उमाजीराजेंनी एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. संपुर्ण
कांतिकारकांच्या इतिहासात अशा प्रकाचा व्यापक जाहिरनामा प्रथमच दिसतो. हे भारताच्या
इतिहासातील सोनेरी पानच आहे.म्हणुनच उमाजीराजे हे आध्यकोतिकारक ठरतात. तेव्हापासुन
उमाजी हे जनतेचे राजे बनले.

दि.२६ जानेवारी १८३१ साली इंग्रजांनी ४ था जाहिरनामा प्रसिध्द केला व त्यात
उमाजीरार्जेना पकडुन देण्या-यास ५०,०००/- रूपये रोख बक्षिस व २०० बिघे (१००एकर)जमीन
जाहीर करण्यात आली. पण तरीही कोणीही इंग्रजांना मदत केली नाही. अशाप्रकारे उमाजीराजेंचा
भारताचा स्वातंत्र्यासाठी असना-या लढ्यास सर्व राजे-रजवाडे, संस्थानिक, जनता पाठिंबा देत होते.
इंग्रजांनी उमाजीराजे विरूध्द ५ वा जाहीरनामा प्रसिध्द केला. माहिती देणा-यास १० हजार रूपये
रोख आणि ४०० बिघे (२०० एकर) जमीन बक्षीस म्हणुन देण्याची घोषणा केली.हा इनाम
त्याकाळात अगनित होता. त्रंबक चंद्रस कुलकर्णी हा फितुर झाला व त्याने उमाजीराजेंची सर्व गुप्त
माहिती इंग्रजांना दिली. १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्‍यातील उतरोली या गावी रात्री बेसावध

असतांना उमाजीराजेंना इंग्रजांनी पकडले. उमाजीरोजेवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.
आणि या नखीर उमाजीराजे यांना न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवुन फाशीची शिक्षा
सुनावली ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४३
व्या वर्षी हसत फासावर चढले. जीवंतपणी सतत ताढ राहिलेली मान जीव गेल्यानंतरच वाकली.
अशा या महान राष्टू पुरुषाचे चरणी विनम्र अभिवादन …

मा. पोलीस आयुक्त, यांचे हस्ते राजेउमाजी नाईक यांचे प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात
आला. तसेच वपोनि श्री. महेंद्र चव्हाण, सायबर पो.स्टे यांनी सुत्रसंचालन केले. मपोशि/विघे,
नेम-नि.कक्ष, नाशिक शहर, श्री. विशाल केंग, कनिष्ठ श्रेणी लिपीक, नाशिक शहर यांनी राजे
उमाजी नाईक यांची कर्तव्य गाथा उपस्थित अधिकारी/अंमलदार यांना वाचुन दाखविली. राजे
उमाजी नाईक जयंती कार्यकमास श्री. दीपक पाण्डेय्‌, पोलीस आयुकत नाशिक शहर, श्रीमती
पौर्णिमा चौगुले-श्रींगी, उपआयुक्त (मुख्यालय), तसेच २३ पोलीस अधिकारी आणि ७५ पोलीस
अंमलदार/मंत्रालयीन अधिकारी व लिपीक वृंद उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.