Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली घुलेवाडी येथील नवीन न्यायालय इमारतीची पाहणी


शिर्डी, दि.९:- संगमनेर येथील विविध न्यायालयांचे कामकाज एकत्रित व सोयीस्कररित्या व्हावे यासाठी घुलेवाडी फाटा येथे उभ्या राहिलेल्या अद्ययावत व प्रशस्त अशा नव्या न्यायालय इमारतीची पाहणी आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.  या इमारतीत लवकरच कामकाज सुरु होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संगमनेर येथील घुलेवाडी फाटा येथे उभ्या राहिलेल्या अद्ययावत व भव्य इमारतीच्या पाहणीच्यावेळी  बाबा ओहोळ, सभापती सौ.सुनंदाताई जोर्वेकर, विश्‍वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास आहेर, जि.प.सदस्य अजय फटांगरे, के.के.थोरात,  उपाध्यक्ष अ‍ॅड. त्र्यंबक गडाख, अ‍ॅड. अशोकराव हजारे, अ‍ॅड. नानासाहेब शिंदे, बार असोसिएशनचे अ‍ॅड.सुनील गाठे, अ‍ॅड.अमित सोनवणे, अ‍ॅड.मधुकर गुंजाळ, अ‍ॅड.प्रकाश राहाणे, अ‍ॅड.सचिन डुबे, अमोल घुले, कैलास सरोदे, राजेश खरे, अ‍ॅड.प्रकाश गुंजाळ, अ‍ॅड. अमित सोनवणे, सिताराम राऊत, घुलेवाडीचे सरपंच सोपान राऊत, सौ. वंदनाताई गुंजाळ, अ‍ॅड.प्रशांत गुंजाळ, सुरेश थोरात,कैलासराव पानसरे, सुभाष सांगळे, यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेरमध्ये मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नाने सर्व प्रशासकीय इमारती  दिमाखदारपणे  उभ्या करण्यात आल्या आहेत. पंचायत समिती, नगरपालिका, प्रांताधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, भव्य क्रीडा संकुल, कवी अनंतफंदी खुले नाट्यगृह, शासकीय विश्रामगृह, प्रवरा नदीवरील विविध पूल, संगमनेर बायपास, पोलीस कर्मचारी वसाहत यासह संगमनेर मध्ये उभे राहिलेले सर्वात मोठे हायटेक बस स्थानक हे शहराच्या वैभवात भर घालणारे आहे.

संगमनेर येथे न्यायालयीन कामकाजाचा व्याप मोठा असून तीन वरिष्ठ न्यायाधीश, एक दिवाणी न्यायाधीश, पाच वरिष्ठ स्तर न्यायाधीश, पाच दिवाणी व प्रथम दंडाधिकारी न्यायाधीश अशी न्यायालये कार्यरत आहेत. सध्याच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या अधिक असून ती दिवसेंदिवस वाढत आहेत. भविष्यात तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्यामुळे येथे औद्योगिक न्यायालय व कामगार न्यायालय होण्याची शक्यता असल्याने ही सर्व न्यायालये एकाच ठिकाणी होण्यासाठी महसूलमंत्री  बाळासाहेब थोरात यांनी राज्य  शासनाकडून 33 कोटींचा निधी प्राप्त केला व ही भव्य व अद्ययावत इमारत बांधण्यात आली. तसेच वकील संघाच्या मागणीनुसार काही जागा वकील संघासाठीही उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शासनाकडून अतिरिक्त निधीची मंजूरी घेवून इमारती परिसरात अंतर्गत जोड रस्ते, डांबरीकरण व मजबुतीकरण, संरक्षक लोखंडी गेट, जमीन सपाटीकरण दूचाकी वाहने पार्कींग, न्यायाधीशांसाठी स्वतंत्र वाहन तळ, इमारत व परिसरात विद्युत जनरेटरची स्थापन करणे, न्यायालयाचे सुशोभीकरण, वकील कक्षात  फर्निचर इत्यादी सुविधा करण्यात आल्या आहेत. ही इमारत अद्ययावत व भव्य अशी महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील एकमेव इमारत ठरेल असा विश्वास मंत्रीमहोदयांनी यावेळी व्यक्त केला.  या अद्ययावत इमारतीमध्ये लवकरच न्यायालयाचे कामकाज सुरू होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रांताधिकारी शशीकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम,पोलीस उपविभागीय अधिकारी रोशन पंडीत, सुनिल पाटील,अभय परमार आदि मान्यवर उपस्थित होते. या इमारतींमुळे घुलेवाडी परिसराची वैभवात भर पडली असून लवकरच न्यायालयाचे कामकाज सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाली आहे.Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party

sources.All rights on the images and contents are with their original owners.

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

Do NOT follow this link or you will be banned from the site!