in

मंत्रिमंडळ निर्णय दि. १६ मे २०१८

मंत्रिमंडळ निर्णय दि. १६ मे २०१८

सार्वजनिक प्रकल्पांच्या जमीन संपादनाला मिळणार वेग; पात्र अतिक्रमणधारकांना एकरकमी भरपाई देण्याचा निर्णय

केंद्र व राज्य शासनाच्या निकडीच्या सार्वजनिक
प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढून संबंधित जमीन
प्रकल्पाला तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी अशा जमिनींवरील पात्र अतिक्रमणधारकांना
एकरकमी नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात
आला. या निर्णयामुळे निकडीचे सार्वजनिक प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे शक्य
होणार असून प्रकल्पाचा खर्च मर्यादित राहण्यास मदत होणार आहे. तसेच
, पात्र झोपडपट्टीधारकांना पक्की घरे प्राप्त होण्यासही सहाय्य
होणार आहे.

केंद्र किंवा राज्य शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी
आवश्यक असलेल्या शासकीय जमिनी विनाविलंब उपलब्ध करुन देताना अशा जमिनींवर असलेली
अतिक्रमणे काढून संबंधित पात्र अतिक्रमण धारकांना नुकसान भरपाई देण्याचे धोरण
अस्तित्वात नव्हते. त्यामुळे यासंदर्भातील धोरण निश्च‍िती करण्यासाठी महसूल
विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली वित्त
, नगरविकास-२
आणि ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांचा सदस्य म्हणून समावेश असलेली समिती
स्थापन करण्यात आली होती. समितीने सादर केलेल्या अहवालानुसार शासकीय जमिनीवरील
तसेच शासनाने श्च‍ित केलेल्या निकषांनुसार संरक्षणास पात्र अतिक्रमण धारकांना
भरपाई देण्याबाबतचे धोरण ठरविण्यात आले आहे.

—–000—–

Source
Opens in another tab

<----------End-Of-This-News-Article---------->



Nasiknews.in is not in control of the media owned by the authors or creators of this post.This is an aggregated news post.This is not a financial or commercial suggestion to the readers.If you think this content is infringing any copyright or trademark or if you have reasons to request its take down, then please contact us with the title of this article Please read our website terms and other policies at the bottom of this site.

What do you think?

18 points
Upvote Downvote

Total votes: 0

Upvotes: 0

Upvotes percentage: 0.000000%

Downvotes: 0

Downvotes percentage: 0.000000%

Written by माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धीच्या कामाचे संपूर्ण समन्वयन करणारी यंत्रणा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाची ओळख आहे. शासन आणि जनता यांना जोडणारा तो एक महत्वाचा दुवा असून शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत आणि त्याबाबतच्या जनतेच्या प्रतिक्रिया शासनापर्यंत पोहचविण्याची दुहेरी जबाबदारी महासंचालनालयास पार पाडावी लागते.

Comments

Leave a Reply

Loading…

Comments

comments

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): यूएसएआयडीच्या सहकार्यामुळे विविध प्रकल्पांना गती

MAHARASHTRA DGIPR NEWS (माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य): यूएसएआयडीच्या सहकार्यामुळे विविध प्रकल्पांना गती

पाकिस्तान/बांग्लादेशातून भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान

पाकिस्तान/बांग्लादेशातून भारतात आलेल्या हिंदू अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान