Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणारे ०२ इसम जेरबंद

गुन्हेशाखा, युनिट कमांक - १, नाशिक शहर यांची कामगिरी

मा.श्री. दीपक पाण्डेय्‌, पोलीस आयुक्‍त सो.नाशिक शहर यांनी पंतग उडविण्यासाठी बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणारे इसमांविरुध्द/दुकानदार यांचे विरुध्द कारवाई करणे बाबतची अधिसुचना जारी केलेली होती. त्या अनुषंगाने मा. श्री. संजय बारकुंड, पोलीस उप आयुक्‍त, सो. गुन्हे., मा. वसंत मोरे, सहा. पोलीस आयुक्‍त सो. गुन्हे शाखा, नाशिक शहर यांनी अशा इसमांवर व दुकानदार यांचेवर कारवाई करणे बाबत सुचना दिलेल्या होत्या.

गुन्हेशाखा युनीट १ चे पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, निलेश पवार, महेश साळुंके, आसिफ तांबोळी, प्रदीप म्हसदे, गणेश वडजे, समाधान पवार असे दुपारचे वेळी गुन्हे प्रतिबंधक गस्त फिरत असतांना पोलीस अंमलदार प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदार मार्फत गंगापूररोड येथे राहणा-या एका इसमाने पतंग उडविण्यासाठी बंदी असलेला नॉयलॉन मांजा विक्री करण्यासाठी आणलेला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली, त्यांनी सदरची बातमी वपोनिरी. श्री. विजय ढमाळ यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री करुन इसम त्याचेकडुन पतंग उडविण्यासाठी बंदी असणारा नायलॉन मांजाचे/ दोराचे २८ गट्टू इएकुण १९, ६००/-रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करुन त्यास जप्त मुद्देमालासह ताब्यात घेवून त्याचे विरुध्द सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे पर्यावरण (संरक्षण कायदा ) १९८६ चे कलम ७ सह भा.द.वि.क. २९०,२९१,१८८ व मपोअँ. १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास पुढील कारवाई करीता सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले

तद्नंतर पोलीस अंमलदार महेश साळुंके यांना गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने तांबेमळा, शांतीनगर, मखमलाबाद येथे राहणा-या एका इसमाने पतंग उडविण्यासाठी बंदी असलेला नॉयलॉन मांजा विक्री करण्यासाठी आणलेला आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली , त्यांनी सदरची बातमी वपोनिरी. श्री. विजय ढमाळ यांना कळवून त्यांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमीच्या ठिकाणी जावुन खात्री करुन इसम त्याचेकडुन पतंग उडविण्यासाठी बंदी असणारा नायलॉन मांजाचे/ दोराचे २३ गट्टू एकुण १६,१००/-रुपये किंमतीचा नायलॉन मांजा जप्त करुन त्यास जप्त मुद्देमालासह ताब्यात घेवून त्याचे विरुध्द म्हसरूळ पोलीस स्टेशन येथे पर्यावरण (संरक्षण कायदा ) १९८६ चे कलम ७ सह भा.द.वि.क. २९०,२९१,१८८ व मपोअँ. १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यास पुढील कारवाई करीता म्हसरुळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

अशा प्रकारे मोठया प्रमाणात बदी असलेला नायलॉन मांजा/दोरा बेकायदेशीर रित्या कब्जात बाळगणारे इसम यांना ताब्यात घेवून त्यांचे कडुन एकुण ५१ नायलॉन माजां/दोयचे गट्टू एकुण किंमत रुपये ३५,७००/- रुपये किंमतीचे जप्त करण्यात येवून त्यांचे विरुध्द पर्यावरण (संरक्षण कायदा ) १९८६ चे कलम ५ सह भा.द.वि.क. २९०,२९१,१८८ व मपोअँ. १२५ प्रमाणे गुन्हे दाखल करुन त्यांना पुढील कारवाई कामी अनुक्रमे सरकारवाडा व म्हसरुळ पोलीस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे.

नायलॉन मांजा हा वन्य पशु व मानवी जिवीतास धोकादायक असल्याने त्याचा वापर करण्यात येवू नये बाबत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे. सदरची कामगिरी मा. श्री. दीपक पाण्डेय्‌ सो. पोलीस आयुक्‍त नाशिक, श्री. संजय बारकुंड सो. पोलीस उप आयुक्‍त गुन्हेशाखा नाशिक शहर, श्री. वसंत मोरे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विजय ढमाळ, सपोनिरी. दिनेश खैरनार, पाउनि. विष्णु उगले पोलीस अंमलदार प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, निलेश पवार, महेश साळुंके, आसिफ तांबोळी, प्रदीप म्हसदे, गणेश वडजे, समाधान पवार अशांनी केलेली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.