Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

पॉवर डेअरी लिमिटेड कंपनीचे ऑफीसचे मागील बाजुचे पत्रा कापुन तोडून ऑफीस मध्ये प्रवेश करून घरफोडी /चोरी

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्‍त दिपक पांण्डेय, नाशिक शहर, मा. पोलीस उपआयुकत परीमंडळ 0२ विजय खरात, मा. सहा पोलीस आयुक्त सोहेल शेख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस उपनिरीक्षक उघडे, पोलीस हवालदार प्रभाकर पवार, पोलीस हवालदार दत्तात्रय गवारे, पोलीस शिपाई सौरभ माळी यांनी परिश्रम घेवून कौशल्यपूर्वक सदरचा गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

दिनांक ०३/०७/२०२१ रोजी रात्री १२:३० ते पहाटे ०३/३० वाजेचे दरम्यान

इंदिरानगर पोलीस स्टेशन सुमन पेट्रोल पंपाचे मागे राजीव नगर, इंदिरानगर नाशिक
येथील पॉवर डेअरी लिमिटेड कंपनीचे ऑफीसचे मागील बाजुचे पत्रा कशाने तरी कापुन तोडून ऑफीस मध्ये प्रवेश करून ऑफीसमधील ठेबलच्या ड्रॉव्हरचे लॉक तोडून त्यातील १,७५,२२४ /- रू रोख रक्‍कम व ऑफीसमध्ये ठेवलेले डेअरी प्रोडेक्ट तुपाचे डब्बे ३ बॉक्स एकुण ३६ ५०० ग्रॅमचे तुपाचे डब्बे १०,६२० ।- रूपयाचे किंमतीचे अज्ञात चोरट्यानी घरफोडी चोरी करून चोरून नेले.

इंदिरानगर पोलीस स्टेशनला 1 गु.र.नं. ११६/२०२१ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दिनांक ३/०७/२०२१ रोजी १३:५६ वा. गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुन्हयाच्या तपासा दरम्यान पोलीस यांना गुप्त बातमी दाराकडून प्राप्त माहीतीच्या आधारे डिबी पथकाने अविरतपणे तपास करून गुन्हयात एकूण आठ आरोपी निष्पन्न केले.

त्यांपैकी २ आरोपी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेले एक लोखंडी कात्री (हत्यार ), रू. ३,५५८८/- किमतीचे एकूण १२ तुपाचे डबे (५०० ग्रॅम प्रत्येकी) व रोख रक्‍कम रू. ७०,०००/- हस्तगत करण्यात आलेले आहेत. दोन विधीसंघर्षग्रस्त बालक यांना मा. बाल न्यायमंडळाकडे हजर करण्यात आलेले आहे.

तसेच साहिल पठाण, हसिम खान व आतिष ज्यांचा पूर्ण नाव पत्ता माहित नाही यांचा शोध घेवून त्यांच्याकडून इतर मुद्दमाल हस्तगत करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे. अटक आरोपीत हे पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्‍त दिपक पांण्डेय, नाशिक शहर, मा. पोलीस उपआयुकत परीमंडळ 0२ विजय खरात, मा. सहा पोलीस आयुक्त सोहेल शेख यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस उपनिरीक्षक उघडे, पोलीस हवालदार प्रभाकर पवार, पोलीस हवालदार दत्तात्रय गवारे, पोलीस शिपाई सौरभ माळी यांनी परिश्रम घेवून कौशल्यपूर्वक सदरचा गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
पॉवर डेअरी लिमिटेड कंपनीचे मालक दिपक दिलीप आव्हाड यांच्या म्हणण्या प्रमाणे नाशिक पोलिसांनी खूप तीव्र गती ने त्यांचं कर्तव्य बजावलं आहे आणि ते पोलिसांच्या या मेहनती वर १००% समाधानी आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.