Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

पालकमंत्र्याच्या हस्ते मोलगी परिसरातील रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन


नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.१७ : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी .पाडवी याच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत मोलगी परिसरातील विविध रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, जि.प.सदस्य सी.के पाडवी, उपअभियंता राकेश जामनेकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत होणाऱ्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास आणि येथील विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास ॲड. पाडवी यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री याच्या हस्ते साक्री उमर ते जांभापाणी या 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी 5 कोटी 97 लक्ष रुपये खर्च होणार आहे. त्यासोबतच राज्य महामार्ग 1 ते लिंबीपाडा, राज्यमार्ग 3 ते आमराईपाडा, मोलगी ते उखली, वगडोनगामल, पाटबारा  ते कोतवालपाडा, पाटबारा ते मौलीगव्हाण या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. या सर्व कामाची एकूण लांबी साधारण 19 किलोमीटर असून त्यासाठी सुमारे 21 कोटीपेक्षा अधिक खर्च होणार आहे. या रस्त्याच्या कामामुळे नागरीकांना देखील चांगली सुविधा निर्माण होईल असे पालकमंत्री म्हणाले.



Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party

sources.All rights on the images and contents are with their original owners.

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

————ट्विटरवर आमचे अनुसरण करा—Follow on on Twitter————

NasikNews.in