Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

पालकमंत्री ॲड. पाडवी यांच्याकडून मांजरेच्या मेंढपाळ बांधवांचे सांत्वन


नंदुरबार, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी मांजरे (ता.जि. नंदुरबार) येथे भेट देवून मेंढपाळ बांधवांचे सांत्वन केले. त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मांजरे येथील मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर नंदुरबार जिल्ह्यात 276 मेंढ्यांसह काही जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी आज मांजरे येथे भेट दिली. नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, मृत्युमुखी पडलेल्या मेढपाळांना शासनाच्या योजनेतून योग्य ती मदत  द्यावी, अशा सूचना त्यांनी  जिल्हा प्रशासनाला दिल्या.



Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.