नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) च्या नावा चषक स्पर्धेचे सामने जाहीर

नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) च्या वतीने आयोजित

212

Get real time updates directly on you device, subscribe now.

नावा चषक स्पर्धेचे सामने जाहीर

नाशिक-नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नावा’ चषक टी टेन इंटर मिडीया क्रिकेट स्पर्धांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून त्यानुसार सामने जाहीर झाले आहेत. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक फ्रवशी इंटरनॅशनल स्कूल हे असून, येत्या 06 जानेवारी 2019 रोजी सकाळी 8.00 वाजेपासुन फ्रवशी इंटरनॅशनलच्या मैदानावर या स्पर्धा रंगणार आहेत.
केसिंग्टन क्लब येथे मंगळवारी लॉटस् पाडण्यात आले. यावेळी सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. स्पर्धेत एकूण 9 संघांनी सहभाग घेतला आहे. त्यापैकी ड्रॉ प्रमाणे पुढील प्रमाणे होणार आहेत 1) महाराष्ट्र टाईम्स विरूध्द पुढारी 2) लोकमत विरूध्द माय एफ.एम. 3) दिव्य मराठी विरूध्द पुण्यनगरी 4) सकाळ विरूध्द देशदुत 5) नावा विरूध्द पहील्या सामन्यातील विजेता त्यांनर क्वॉटर फायनल, सेमीफायनल व फायनल चे सामने रंगणार आहेत.
सर्व सामने बाद फेरीनुसार होणार असुन या स्पर्धेसाठी साई स्पोर्टस् यांचे सहार्का लाभले आहे. गेल्या 15 वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी नावाच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत विजयी ठरणार्‍या संघाला नावा चषक प्रदान केला जातो. शिवाय उत्कृष्ट बॅटस्मन, उत्कृष्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यांसारखी बक्षिसे दिली जातात. मिडिया जगतामध्ये या स्पर्धांविषयी विशेष औत्सुक्य असते. या स्पर्धेसाठी सर्व संघांची जोरदार तयारी चालू असून विविध मैदानांवर सराव केला जात आहे.
यावेळी फेमचे अध्यक्ष मोतीराम पिंगळे, नावा संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल देशपांडे, क्रिकेट समिती प्रमुख सचिन गितेरवि पवार, विठ्ठल राजोळे, दिलीप निकम, मिलींद कोल्हेपाटील, प्रवीण चांडक, राजेश शेळके, नितीन राका, गणेश नाफडे, सुभाष लगली, निजानंद देशपांडे, तसेच वृत्तपत्र प्रतिनिधी लोमतचे राहुल धांदेे, सचिन वायकोस, सकाळचे सुनिल पाटील, मयुर मराठे, महाराष्ट्र टाईम्सचे अबिद सय्यद, रूपेश शर्मा, निलेश मिश्रा, अतुल मगर, माय एफ.एम.चे तेजस घाटे, पुढारीचे बाळासाहेब वाजे, सतिश डोंगरे, दिव्य मराठीचे इशाक शेख,विजय क्षिरसागर, देशदुतचे संदिप राऊत, रवि परदेशी, पुण्यनगरीचे अतुल पाटील, आदी उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments
Loading...

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy