Nasik News
Top Positive News Aggregator, Curator and Publisher of Nashik City

जळगाव जिल्हयातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा


जळगाव, (जिमाका) दि. 25 – सद‌्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी  अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तसेच भारतीय नागरिकांसाठी खालील प्रमाणे हेल्पलाईन नवी दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कक्ष (गृह विभाग), नवी दिल्ली , फोन – टोल फ्री -1800118797

दूरध्वनी क्रमांक -011-23012113/23014105/23017905, फॅक्स -011-23088124

ईमेल – situationroom@mea.gov.in

जळगाव जिल्हयातील कोणतेही नागरिक, विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास त्यांच्या नातेवाईकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव

दूरध्वनी क्रमांक -0257-2217193 / 2223180

ईमेल –scy.jalgaon@gmail.com  असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

०००००Images are for reference only.Images and contents gathered automatic from google or 3rd party sources.All rights on the images and contents are with their original owners.

Get real time updates directly on you device, subscribe now.